राशीनुसार शिव मंत्राच्या जपाचा घ्या विशेष लाभ | Shree Swami Samarth



संकलन :- श्री  सतीश अलोणी

मित्रांनो राशीनुसार शिव मंत्राचा जप कराल तर तुम्हाला विशेष लाभ होऊ शकतो भगवान शंकर हे लवकर प्रसन्न होणारे दैवत आहे.  ते आपल्या कोणत्याही भक्तास निराश करत नाहीत. इतकेच नव्हे तर शंकराची पूजा इतर देवता सुद्धा करतात, म्हणूच त्यांना देवांचे देव महादेव असे सुद्धा संबोधले जाते.  असे म्हटले जाते कि जर आपल्या राशीनुसार भगवान शंकरांच्या काही विशिष्ट मंत्रांचा जप व्यक्तीने केला तर त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. इतकेच नव्हे तर सर्व पापां पासून सुद्धा भक्तांना मुक्ती मिळते. 

तर मित्रांनो चला तर मग भागूया कोणत्या राशीला कोणते शिव मंत्र म्हंटले तर विशेष लाभ होईल

मेष रास
ह्या राशीच्या जातकांवर भगवान शिव ह्यांची विशेष कृपा दृष्टी असते. ह्यांच्या जीवनात पूर्वी ज्या काही समस्या येत होत्या त्या सर्व आता संपुष्टात येऊ शकतात. सर्व खोळंबलेली कामे पूर्णत्वास येतील, इतकेच नव्हे तर आपण कोणी नवे मित्र बनविलेत तर हि मैत्री दीर्घ काळ टिकू शकेल. मेष राशीच्या व्यक्तींनी लाल व आकडयाच्या फुलांनी शंकराची पूजा करावी. मेष राशीच्या जातकांनी "नागेश्वराय नमः"  ह्या मंत्राचा जप १०८ वेळा सकाळी पूजे दरम्यान करावा. त्यामुळे आपणास सर्व कार्यात यश प्राप्त होईल. 


वृषभ रास
वृषभ राशीच्या व्यक्तींनी मनापासून शंकराची आराधना करावी व पूजे दरम्यान रुद्राष्टकाचे पठन करावे. त्याने आपल्या आर्थिक स्थितीसह मानसिक स्थितीवर सुद्धा सकारात्मक प्रभाव होत असल्याचे दिसून येईल. आपण चिंता मुक्त जीवन जगू शकाल. 


मिथुन रास
 ह्या राशीच्या व्यक्तींनी उसाच्या रसाने शंकरास अभिषेक करून बिल्वपत्र अर्पण करावे. ह्याच बरोबर पंचाक्षरी मंत्र 
"नमः शिवाय"
 ह्याचा १०८ वेळा जप केल्यास तो लाभदायी होईल. 


कर्क रास
 कर्क राशीच्या व्यक्तींने  
"सोमनाथाय नमः"
 ह्या मंत्राचा १०८ वेळा जप करावा लागेल. त्याने आपणास जीवनातील सर्व आघाडयांवर यशाची प्राप्ती होऊ शकेल. 


सिंह रास
 ह्या राशीच्या जातकानी गूळ मिश्रित पाणी व गहू शंकरास अर्पण करावे. ह्या राशीच्या व्यक्तींनी 
महामृत्युंजय मंत्राचा म्हणजेच ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्‌॥ 
१०८ वेळा जप करावा. त्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. 


कन्या रास
ह्या राशीच्या जातकांसाठी सभोवतालची नकारात्मकता दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. 
शिव पंचाक्षरीचा  जप हा आपल्यासाठी एक रामबाणा सम उपाय आहे.   


तूळ रास
 ह्या राशीच्या जातकांसाठी हि  आर्थिक व सामाजिक स्तरावर मोठे परिवर्तन घडवून आणणारी आहे. आपण 
शिव सहस्त्र नामावलीचे पठन करू शकता.  


वृश्चिक रास
आपल्यासाठी श्रावण महिन्यात रोज पंचामृताने शंकरावर केलेला अभिषेक कल्याणदायी असल्याचे मानण्यात येते. आपण रुद्राष्टकासह  "शिव - पार्वत्यै नमः"  ह्या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. 


धनु रास
ह्या राशीच्या जातकांना ह्या वर्षी  नवीन कार्यात सफलता प्राप्त होईल. त्यासाठी आपण पूजा विधी नंतर १०८ वेळा 
"ॐ नमः शिवाय" मंत्राचा १०८ वेळा जप करणे हितावह राहील. 


मकर रास
ह्या राशीच्या जातकानी विधिवत पूजन करून गहू दान करावेत त्याच बरोबर "शिवाय नमः"  ह्या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. त्याने आपले अडकलेले पैसे मिळतील व कारकिर्दीत प्रगती घडेल. 


कुंभ रास
ह्या राशीच्या जातकांना ह्या आपल्या जीवनातील विविध परीक्षेतून जावे लागेल. आपल्यासाठी शंकराच्या आराधने शिवाय कोणताच तरणोपाय नाही. आपण  शिव षडाक्षर  मंत्राचा १०८ वेळा जप करावा, ज्याने आपल्या जीवनात स्थैर्य प्राप्त होईल. 


मीन रास
आपण शंकराची आराधना करताना रावण रचित शिव तांडव  वाचावे. कारण ह्या वेळेस आपल्या जीवनातील अनेक कठीण समस्यांना आपणास सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पूजे दरम्यान हे विशिष्ट पठन केल्याने आपण आपल्या समस्या दूर करू शकाल.

------------------------------------------------
मित्रांनो हे संकलन :- श्री  सतीश अलोणी यांनी केले आहे.

धन्यवाद 
।। श्री स्वामी समर्थ ।।

Comments

Thanks for valuable gift. God bless you.