संकष्ठी चतुर्थीचं महत्त्व, फायदे, कथा | Importance Of Sankashti Chaturthi | Benefits | Story

मित्रांनो आज आपण संकष्ट चतुर्थी चे महत्व आणि फायदे जाणून घेणार आहोत.

प्रत्येक मराठी महिन्याची वद्य चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते.
गणेश भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात. गणपतीचे नामस्मरण करून संकष्ट चतुर्थी व्रत आचरिले जाते. गणपती उपासकांसाठी संकष्ट चतुर्थीला अधिक महत्त्व असते. चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. महाराष्ट्रात प्रत्येक शहरात चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असल्याने त्या त्या वेळेनुसार चंद्रोदय झाल्यानंतरच नैवेद्य दाखवला जातो. यानंतर गणेश उपासक, भाविक दिवसभराचा उपवास सोडतात.
संकष्ट चतुर्थीचे महिला आणि पुरुष यांच्यापैकी कोणीही करू शकते. काही जण मिठाची चतुर्थी करतात तर काहीजण पंचामृती चतुर्थी करतात. या दोन्ही व्रतांसाठी चंद्रदर्शन महत्त्वाचे आहे.
दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. यासाठी मोदक करण्याची पद्धती आहे. त्यानंतर भोजन करावे. या व्रताचा कालावधी आमरण, एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा आहे. व्रतराज या ग्रंथात हे व्रत सविस्तर सांगितले आहे.

मिठाची चतुर्थी आणि पंचामृती चतुर्थी

मिठाच्या चतुर्थीसाठी २१ मोदक करतात. यात एक मोदक मिठाचा असतो आणि बाकीचे २० मोदक गुळाचे असतात. गणपतीला गुळाच्या एका मोदकाचा प्रतिकात्मक नैवेद्य दाखवतात. नंतर डोळे झाकून सर्व मोदक एका थाळीत ठेवले जातात आणि व्रत करणारी व्यक्ती एक एक करुन मोदकांचे सेवन करते. यात ज्या क्षणी मिठाचा मोदक येतो त्यावेळी तो मोदक खाऊन पुढचे जेवण थांबवले जाते. बाकीचे मोदक न खाता गायीला खाऊ घालतात. तर पंचामृती चतुर्थीसाठी गायीचे दूध आणि या दुधापासून तयार केलेल्या तुपाचा वापर करुन संपूर्ण स्वयंपाक केला जातो.

आज खूप जण संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात. खासकरून गणेश भक्त करतातच ! हे व्रत करण्यामागे असं काय घडलं आहे की, हे व्रत केल्याने समाधान प्राप्त होते?
तर....................

फार पूर्वी यादवकुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने शंभर वर्षे सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य स्यमंतक मणी दिला. हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा.

सत्राजिताकडील स्यमंतक मण्याविषयी भगवान श्रीकृष्णाला समजल्यावर भगवान श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली. परंतु सत्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला. पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधु प्रसेन हा स्यमंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्यमणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारुन तो स्यमंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला.

इकडे प्रसेन स्यमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्णकारस्थान असल्याचा आरोप केला. ही गोष्ट भगवान कृष्णास कळली. आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग भगवान कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला. प्रसेनाला शोधत भगवान कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तर काय? एके ठिकाणी प्रसेन मरुन पडलेला. जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या. त्यांचा माग काढीत भगवान  कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व स्यमंतक मणी शोधू लागला.

अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने भगवान कृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घबराट झाली. गोकुळात नंद-यशोदेला या युद्धाची वार्ता कळली. तेव्हा ते भगवान  कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्त्या श्रीगणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले.

श्रीगणेशाच्या कृपाप्रसादाने भगवान श्रीकृष्णास विजयप्राप्ती झाली. जांबुवंताने स्यमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली. गोकुळात, द्वारकेत सगळीकडे आनंदीआनंद झाला. भगवान श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे  सांगतात की, पूर्वी भाद्रपदात गणेशचतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गाईच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्यापाण्यात भगवान कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्रीगणेशाने चंद्रास दिलेला शाप भगवान श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने भगवान श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने भगवान श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा भगवान श्रीकृष्णास दिली.

दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्रीगणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात.


चमत्कार घडवणारे विशेष श्री गणेश मंत्र
---------------------------------------
गणपतीची आराधना केल्याने अर्थ, विद्या, बुद्धी, विवेक, यश, प्रसिद्धी, सिद्धी सहज प्राप्त होते. अश्याच विघ्न विनाशकाच्या मंत्राचा जप केल्याने प्रत्येक संकट, विघ्न, आलस्य, रोग, बेकारी, धनाभाव व इतर समस्यांचा तत्काल निवारण होतं.

प्रस्तुत केलेले मंत्र गणपतीचे त्वरित परिणाम देणारे मंत्र मानले आहेत.

गणपतीचा बीज मंत्र 'गं' आहे. यापासून युक्त मंत्र- 'ॐ गं गणपतये नमः' मंत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. षडाक्षर मंत्राच जप आर्थिक प्रगती व समृद्धी प्रदायक आहे.

ॐ वक्रतुंडाय हुम्‌
कोणाद्वारे नेष्टसाठी केलेली क्रिया नष्ट करण्यासाठी, विविध इच्छा पूर्ण करण्यासाठी उच्छिष्ट गणपतीची आराधना करावी. हे जप करताना तोंडात गूळ, लवंग, वेलची, बत्तासा, तांबूल, सुपारी असलं पाहिजे. ही साधना अक्षय भंडार प्रदान करणारी आहे. यात पवित्रता-अपवित्रतेचा विशेष बंधन नाही.

१). उच्छिष्ट गणपती मंत्र
ॐ हस्ति पिशाचि लिखे स्वाहा

2 . आलस्य, निराशा, कलह, विघ्न दूर करण्यासाठी विघ्नराज रूपाची आराधनाचा हा मंत्र जपावा-
गं क्षिप्रप्रसादनाय नम:

3 . विघ्न दूर करून धन व आत्मबल प्राप्तीसाठी हेरम्ब गणपती मंत्र जपावा-
'ॐ गं नमः'

४ . रोजगार प्राप्ती व आर्थिक वृद्धीसाठी लक्ष्मी विनायक मंत्र जपावा-
ॐ श्री गं सौम्याय गणपतये वर
 वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।

५ . विवाहात येणारे दोष दूर करण्यासाठी त्रैलोक्य मोहन गणेश मंत्राचा ज करावा. याने शीघ्र विवाह व अनुकूल जीवनसाथीची प्राप्ती होते-

ॐ वक्रतुण्डैक दंष्ट्राय क्लीं ह्रीं श्री गं गणपते वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।
 या मंत्राच्या व्यतिरिक्त गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेश स्तोत्र, गणेशकवच, संतान गणपती स्तोत्र, ऋणहर्ता गणपती स्तोत्र, मयूरेश स्तोत्र, गणेश चालीसाचा पाठ केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात .

संकष्ट चतुर्थी निमित्त काय करावे?
---------------------------------------------------
१) सकाळी लवकर उठून आंघोळ आटपून घरातल्या देवांची मनोभावे पूजा करा.
२) गणपतीला जास्वंदाची फुले आणि दुर्वा अर्पण करा.
३) अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणा.
४) गणपतीचे आणखी काही श्लोक, स्तोत्र, मंत्र म्हणायला हरकत नाही.
५) तब्येत साथ देत असल्यास दिवसभर उपवास करा, रात्री चंद्रदर्शन करुन उपवास सोडा फलाहार, सुकामेवा, दूध असा हलका आहार घ्या. 
राग, लोभ या दुर्गुणांचा त्याग करण्यासाठी संकल्प करा आणि त्यावर अंमल करा.

संकष्ट चतुर्थी निमित्त काय टाळावे?
१) मांसाहार टाळावा. दारू, धुम्रपान अशी शरीराला घातक असलेली व्यसने टाळावी.
२)  कोणाशी वाद घालू नये, हाणामारी टाळावी. अपशब्दांचा वापर टाळावा.
३) कोणालाही दुखवू नये. प्राणी आणि पक्षी यांना दुखवू नये.


संकष्टी चतुर्थीची कथा
--------------------------------
एकदां गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला बघुन चंद्र उपहासाने हासला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फ़ार राग आला. त्या रागाच्या भरात गणपतीने चंद्राला शाप दिला की
" आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल!"
 गणपतीचा हा शाप ऐकून चंद्र भयभीत झाला व क्षमा करुन शाप मागे घ्या, असे विनवणी करू लागला. गणपती ऐकत नाही हे जेव्हा चंद्राच्या लक्षात आले, तेव्हा चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले.

चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस " भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी " तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले.त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे?

तेव्हां गणपतीने सांगितले की , त्याने संकष्ट चतुर्थी व्रत" करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्या मुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खॊटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने "संकष्ट चतुर्थी व्रत " केल्यामुळे गेला, अशी कथा आहे. आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी सर्वांनी करावयाचे , हे एक साधे , सोपे पण शीघ्र फ़लदायी व्रत आहे.श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फ़लदयी व महत्वाची मानतात. चंद्राने तप करुन गणपतीला प्रसन्न करून घेतल्याने चंद्र दर्शनाचे महत्व आहे. या दिवशी प्रत्येकाने निदान वर्षांतून या दोन तरी अवश्य कराव्या, असे शास्त्र सांगते.

या सोप्या उपायांनी मिळेल गणपतीचा आशीर्वाद
अनेक लोकं दर महिन्यात येणारे हे चतुर्थीचे व्रत श्रद्धापूर्वक करतात.  गणपती देवता समृद्धी, बुद्धी आणि सौभाग्य प्रदान करणारा देव आहे. परंतू या दिवशी काही विशेष उपाय करून आपण अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

१) आपण आपले मैत्रीचं नातं मजबूत करू इच्छित असाल तर या दिवशी आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला हिरव्या रंगाची एखादी धातूची वस्तू भेट करू शकता.

२) एखादा मित्र नाराज असल्यास या दिवशी गोमती चक्र घेऊन गणपती मंदिर जावे आणि आपल्या मित्राला मनात ठेवून देवाची पूजा करावी. शक्य असल्यास ते गोमती चक्र मित्राला द्यावे आणि शक्य नसेल तर मंदिरात ठेवून द्यावे. याने रुसलेला मित्राशी पुन्हा चांगले संबंध स्थापित होतील.

३) व्यवसायात उन्नतीसाठी बुध मंत्र ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: हे मंत्र 21 वेळा जपावे.

४) मनोकामनापुरतीसाठी गणपतीची विधिपूर्वक पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पित करावे. गूळ- खोबर्‍याचे नैवेद्य दाखवावे.

५) ऊर्जावान वाटावे यासाठी गणपतीला प्रार्थना करून १०८ वेळा श्री गणेशाय नम: या मंत्राचा जप करावा. तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदाचे फुल अर्पित करावे.

६) सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मूग टाकून मंदिरात दान करावे. याने सुख- सौभाग्यात वृद्धी होते.

७) उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपतीसमोर कापूर जाळून ऊँ गं गणपतये नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

८) तसेच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असला आणि यश हाती लागत नसेल, प्रत्येकावेळी काही अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्याची गरज आहे. चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्यावी. आपल्याला कामात यश मिळेल.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चतुर्थी तिथीच्या मागील 8 रहस्य
--------------------------------
प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थ्या असतात. अश्याप्रकारे वर्ष भरात 24 चतुर्थ्या असतात. परंतु दर 3 वर्षाच्या नंतर अधिकाचा महिना येत असल्याने एकूण 26 चतुर्थ्या होतात. प्रत्येक चतुर्थीचे आप आपले महत्व आहे. चला तर मग या चतुर्थींचे 8 रहस्य जाणून घेउ या
1 दोन विशेष चतुर्थी : चतुर्थी तिथीची दिशा नेऋत्य आहे. अवसेच्यानंतर आलेल्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हटले जातं आणि पौर्णिमे नंतरच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.

2 चतुर्थीचे इष्ट देव गणपती : गणपती हे शंकराचे पुत्र आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात.

 3 विनायकी चतुर्थी : भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला गणपतींचा जन्म झाला होता. ह्याला विनायकी चतुर्थी असे ही म्हणतात. काही ठिकाणी वरद विनायक चतुर्थी आणि गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. सुख, सौभाग्य प्राप्तीसाठी या दिवशी गणेशाची पूजा करावी.

4 संकष्टी चतुर्थी : माघी महिन्यातील कृष्ण पक्षाला येणारी चतुर्थीला संकष्टी चतुर्थी, माघी चतुर्थी किंवा तिळकुटी चतुर्थी असे ही म्हणतात. बाराही महिन्यातील चतुर्थींपैकी ही चतुर्थी सर्वात मोठी आहे. चतुर्थीचे उपास केल्याने सर्व अडथळे दूर होऊन आर्थिक लाभ मिळतं.

 5 निषिद्ध चतुर्थी : निषिद्ध चतुर्थी म्हणजेच रीती तिथी. ज्या तिथीला काही ही नसते ती रीती तिथी म्हटली जाते. त्या तिथीला काही ही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते.

 6 शनिवारी चतुर्थी : गुरुवारी येणारी चतुर्थी मृत्यूची असते. शनिवारी येणारी चतुर्थी सिध्दिदात्रा असते. अश्या स्थितीमध्ये रीती तिथी आल्यास तो दोष संपतो.

 7 कृष्ण चतुर्थी मध्ये जन्मलेले मुलं : ज्योतिष शास्त्रानुसार चतुर्थीला 6 भागांमध्ये विभागले आहे. पहिल्या भागात जन्म झाल्यास शुभ असतं, दुसऱ्या भागात जन्म झाल्यास वडिलांसाठी नाशक, तृतीय भागात जन्म झाल्यास आई साठी नाशक, चौथ्या भागात जन्म झाल्यास मामासाठी नाशक, पाचव्या भागास जन्म झाल्यास कुटुंबाचा नाशक आणि सहाव्या भागास जन्म घेतल्यास संपत्तीचा किंवा स्वतःचा नाश होतो.

8 जन्मदोष प्रतिबंध : या दोषाच्या निवारणासाठी गणपतीची पूजा करायला हवी. किंवा सोमवारचे उपास धरून शंकराची पूजा करायला हवी. प्रदोष करायला हवे. हनुमान चालीसाचे पठण करायला हवे. किंवा महामृत्युंजय मंत्राचा जाप केले पाहिजे. आपले घर दक्षिण मुखी असल्यास ते घर आपल्यासाठी फलदायी ठरतं नाही.

Comments

travelingbeast said…
There are many blogs I have read But when I read Your Blogs I have found such useful information, fresh content with such amazing editing everything is superb in your blog, Thank you so much for sharing this useful and informative information with us.

Cybonetic Technologies is a leading web hosting company in Patna offering Fast and Reliable Web Hosting. Buy a domain and hosting at the cheap prices with 24x7 support.
web hosting company in patna