स्वामी सेवा करूनही अनेकदा त्याची फळे का मिळत नाही? स्वामी समर्थांनी दिले हे उत्तर...




🌹🌹 स्वामी लीला 🌹🌹
।। श्री स्वामी समर्थ ।।

आपले स्वामी बोलतात .....“ एक.. दोन.. तीन.. ”

अक्कलकोटवासीयांचे खरोखर पुण्य फळाला आले म्हणून स्वामी महाराज सगुण स्वरूपात अक्कलकोट नगरीत अवतरले.. आणि अक्कलकोट मधील पुण्य पावन लोकांना सुद्धा ह्याची जाणीव होती.. म्हणून जर कोणी कोणत्याही धर्माचा असो वा जातीचा असो.. सर्वांचे एकच दैवत म्हणजे स्वामी महाराज होय.. आणि मग कोणाला समजले कि, आपण ज्या रस्त्याने चाललो आहे.. येथेच बाजूला स्वामी आहेत.. मग स्वामींचे दर्शन घेतल्या शिवाय कोणीही पुढे जात नव्हते.. वा जर कोणाला काही महत्वाचे कामासाठी जायचे असेल तर स्वामींचे दर्शन हे ठरलेलेच असे..!! असो. ह्यातच एकदा मोहरमच्या दिवसांत स्वामी महाराज खाजा पिराच्या दर्ग्यात बसलेले होते.. तेथे सभोवताली पुष्कळ सेवेकरी मंडळी बसलेली होती.. ह्यावेळी एक मुस्लीम शिपाई हातात तबक घेवून फकिरी मागण्यासाठी निघाला.. आणि जेव्हा त्याला समजले कि, स्वामी महाराज येथेच आहेत.. तेव्हा तो स्वामींच्या दर्शनासाठी आला.. त्याने तबक स्वामींच्या समोर ठेवले.. आणि दर्शन घेवून उभा राहिला.. इतक्यात स्वामींनी एक लीला केली.. स्वामींनी समोर ठेवलेले तबक आपल्या हातात घेतले.. आणि त्यात जे पाच सहा पैसे होते.. ते हातात घेवून मोजू लागले.. स्वामी बोलू लागले.. “ एक.. दोन.. तीन.. ” आणि पैसे मोजून पुन्हा तबकात टाकावे.. त्या नंतर पुन्हा सर्व पैसे हातात घ्यावे आणि मोजावे.. आणि मोजता मोजता.. पैशांची गणती पंधरा झाली.. सोळा झाली.. सतरा झाली.. वीस झाली... थोडक्यात तबकात पैसे वाढू लागले.. आणि हा सर्व प्रकार शिपायासह सभोवताली जमलेली मंडळी बघत होती.. सर्वांना आश्चर्य वाटू लागले.. इतक्यात ह्या शिपायाला काही रहावले नाही.. आणि तो मोठ्याने बोलला “ महाराज पैसे जमे लगे.. महाराज पैसे जमे लगे..!! ” त्याने असे बोलताच स्वामींनी आपला हात आखडता घेतला...आणि तबक खाली ठेवले.. स्वामी भक्त हो !! स्वामींनी तबक खाली ठेवताच.. चमत्कार झाला.. तबकातील पैसे पूर्ववत झाले.. आणि मोजून बघितले तर त्यात पुन्हा पाच –सहा पैसेच निघाले.. स्वामींची हि लीला बघून सर्वांना आश्चर्य वाटले आणि सर्वांनी एक घोषात स्वामींचा जयजयकार केला..!!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

🌹🌹 स्वामी बोध 🌹🌹

स्वामी महाराज गुरुतत्व आहे.. स्वामींच्या एका एका लीलेमध्ये असंख्य बोधांचा खजाना दडलेला आहे.. अगदी ह्या प्रमाणेच आजच्या लीलेत सुद्धा असंख्य बोध आहेत.. पैकी “ जेव्हा आपण समर्पित भावनेने स्वामींना प्रार्थना करतो.. कशाची तरी प्राप्ती व्हावी म्हणून सेवा करतो.. कर्म करतो.. तेव्हा त्याचे फळ भलेही अनेक लोकांच्या माध्यमातून येत असेल.. परंतु त्या सर्वांचा स्त्रोत फक्त एकच आहे.. ते म्हणजे ‘ श्री स्वामी समर्थ ’ हि खूप छान समज स्वामी आज आपणास देत आहेत..!! ”. बघा !! आजच्या लीलेत मुस्लीम शिपाई.. फकिरी मागण्यासाठी तबक घेवून चालला होता.. जेव्हा तो स्वामींकडे आला.. तेव्हा स्वामींनी त्याच्या तबकातील पैसा अधिक पटीने वाढवण्याची लीला केली.. ह्यातून स्वामींनी त्याला आगावूपणे संकेत देत हीच समज दिली कि, “ अरे बाळा , जेव्हा तू फकिरी मागण्यासाठी गावात जाशील.. अनेक लोक तुझ्या तबकात पैसे देतील.. मग ते पैसे पाच चे सहा होतील.. सात होती.. असे करता करता वीस होतील.. आणि हे वाढतच जाईल.. अशा वेळी तू हो समज पक्की ठेव कि, जरीही पैसे देणारे माणस वेगवेगळे असतील.. माध्यम वेगवेगळे असतील.. परंतु देणारा खरा दाता एकच आहे.. हा दाता म्हणजेच मीच आहेत.. मीच एकमेव स्त्रोत आहे..” स्वामी भक्त हो !! आणि स्वामींनी त्याला हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे हा शिपाई त्या माध्यमांना स्त्रोत मानुन चालेल.. आणि समजा कदाचित कोणी एखाद्याने त्यांस फकिरी दिली नाही.. तर त्यांच्या बद्दला इर्षा वा तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता असते.. आणि इर्षा वा तिरस्कार माणसाला स्वामीपासून दूर नेतात... आणि म्हणून स्वामी भक्त हो !! आजही तुमच्या आमच्या जीवनात असेच घडते आहे.. जेव्हा आपण स्वामींना शरण जातो.. आपले कर्म करतो.. तेव्हा त्याचे फळ अनेक लोकांच्या माध्यमातून आपणास येत असते.. खरतर हि लोक माध्यम आहेत.. आणि निश्चितच आपल्याला ह्यांच्या बद्दल कृतज्ञ रहायचे आहे.. परंतु हे सर्व करत असतांना आपण ह्या माध्यमांनाच स्त्रोत मानून चालतो.. आणि आपले मन स्वामींना अप्रत्यक्ष दुय्यम स्थान देते.. आणि जेव्हा आपण आपल्या जीवनात स्वामींना दुय्यम स्थान देतो.. सहाजिकच समस्येचा गुंता अजून वाढत जातो.. उदा. जसे आपल्याला आर्थिक चणचण असेल.. तेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो.. तेव्हा आपल्या जीवनात अशी कोणीतरी एखादी व्यक्ती येते कि , जी आपल्याला मदत करते आणि आर्थिक संकटातून बाहेर काढते.. आणि सहाजिकच आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल आदर भाव असतो... आणि असायलाच पाहिजे.. परंतु इथे एक गडबड होते.. आपण त्या व्यक्तीलाच पैशाचा स्त्रोत मानून चालतो.. आणि अप्रत्यक्ष स्वामींच्या प्रती समर्पित भाव कमी होऊ लागतो.. आणि त्या व्यक्तीलाच स्त्रोत मानल्याने.. भविष्यात जेव्हा जेव्हा कधी अडचण येते तेव्हा तेव्हा आपण त्याच्या कडूनच अपेक्षा ठेवतो.. परंतु स्वामी भक्त हो !! तो व्यक्ती सुद्धा माणूसच आहे.. त्याच्या जीवनात सुद्धा चढ उतार असतात.. आणि जर एखादे वेळेस ती व्यक्ती स्वतः आर्थिक समस्येत असेल.. सहाजिकच त्या वेळेला आपणास आर्थिक मदत करण्यास नकार देते.. आणि अशा वेळी आपल्या मनात तिच्या बद्दल द्वेष निर्माण होतो.. वा तिरस्कार निर्माण होतो.. आणि या पूर्वी संकटकाळी त्या शरीराद्वारे झालेले उपकार विसरून.. आपले मन कृतघ्न होते.. आणि पुन्हा आपल्या आर्थिक समस्येला प्रारंभ होतो.. थोडक्यात ह्या सर्व प्रकारचे मूळ म्हणजे.. त्या व्यक्तीलाच आपण स्त्रोत मानून चाललो हे अज्ञान होय.. आणि खरा दाता स्वामीच आहेत.. हे सत्य विसरणे होय.. म्हणून आजच्या लीलेतून बोध घेता.. आपल्याला हि समज पक्की करायची आहे कि, स्वामींच एकमेव स्त्रोत आहेत.. आणि स्वामीच विविध माध्यमातून आपणास मदत करत आहेत.. आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्या ज्या माध्यमाद्वारे आपल्याला मदत भेटली.. त्यांच्या बद्दल आजीवन नम्र आणि कृतज्ञ भाव ठेवायचा आहे.. आणि जेव्हा आपण ह्या भावनेत राहतो.. बघा !! संपूर्ण सृष्टी आपल्याला मदत करते आहे.. हा अनुभव येईल.. आपली समस्या सोडवण्यासाठी स्वामी महाराज कोणी ना कोणी पर्याय उपलब्ध करतातच.. हा अनुभव येईल.. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे परमस्त्रोता.. !! तूझेच एकमेव अस्तित्व आहेस.. ह्या ब्रम्हांडात तुझाच खेळ सुरु आहे.. देणारा तूच आहेस आणि घेणारा सुद्धा तूच आहेस.. इथे तूच तुला देतोस.. तूच तुला दिले म्हणून तूच तुझ्यावर खुश होतोस.. आणि खुश होऊन.. तूच तुला हजारो पटीने वाढवून पुन्हा परत देतोस.. हे आई !! तुझ्या अतर्क्य लीला समजण्याची बुद्धी दे.. त्यातून तू जे बोध देत आहेस.. ते ग्रहण करण्याची पात्रता दे.. आणि असाच तुझ्या चरणी असलेला समर्पण भाव वाढवत.. आमच्यातील अहंकाराला विलीन कर.. कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही..!! ”

बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!

।। श्री स्वामी समर्थ ।।


Comments