विष्णू सहस्त्रनाम आणि तुळशी अर्चनाचे महत्त्व व फायदे । Benefits & Importance of chanting Vishnu Sahasranama



विष्णू सहस्त्रनाम आणि तुळशी अर्चनाचे महत्त्व व फायदे । Benefits & Importance of chanting Vishnu Sahasranama


श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

#श्रीक्षेत्र करवीर येथे धर्मदत्त नावाचा सत् शील ब्राह्मण राहत हाेता. बालपणापासूूनच ताे विष्णुभक्त हाेता. माता पित्याच्या मृत्यूनंतर संसाराचा पाश मागे लावून न घेता त्याने ब्रह्मचारी राहून प्रभुसेवेचे व्रत घेतले. पंचगंगेवर त्रिकाल स्नान, संध्या करून ताे नामस्मरणात दंग असे. त्यासाठी त्याने श्री विष्णु सहस्त्रनामाचा अाश्रय घेतला. जागृत अवस्थेत त्याच्या मुखात सदैव श्री विष्णु सहस्त्रनाम असे. अगदी भिक्षा मागताना, इतकेच नव्हे तर रस्त्याने चालतानादेखील ताे श्री विष्णु सहस्त्रनामाचा घाेष करीत असे. विविध उपवनांमधून तुलसी मंजिरी जमा करून सायंकाळी श्री विष्णु सहस्त्रनामासह, श्री लक्ष्मी- नारायणास सहस्त्र मंजिरी (तुळस) अर्पण करण्याचे त्याचे व्रत अखंड चालू हाेते. त्यासाठी ताे पंचगंगेवर सायं संध्या करून हाती पळी-पंचपात्र व गंगेत बुडवून स्वच्छ केलेल्या सहस्त्र तुलसी मंजिरी घेऊन अाेल्याने विष्णुसहस्त्रनामाचा घाेष करीत श्री लक्ष्मी-नारायण मंदिरात जात असे.*

ताे ज्या मार्गाने मंदिराकडे जात असे त्या मार्गावर एक माेठा पुरातन अश्वत्थ वृक्ष हाेता. त्याच्या अाश्रयाने एक शापभ्रष्ट पिशाच्चीनी वास्तव्य करीत असे. ती लहान मुलांना त्रास देत असे. लाेक त्या मार्गाने जात नसत.  त्यामुळे ताे मार्ग निर्जन हाेता. सायंकाळी तर त्या मार्गाकडे काेणी फिरकतही नसे. तुलसी अर्चनाचा धर्मदत्ताचा हा क्रम वार्धक्यापर्यंत चालू हाेता. त्याच्या येण्याकडे ही पिशाच्चीनी डाेळे व कान लावून असे.कारण दृष्टिपथा -त अालेल्या धर्मदत्ताचे श्री विष्णु सहस्त्रनाम कानावर पडल्याने तिला खूप बरे वाटे. हळूहळू तिची पिशाच्च वृत्ती पालटू लागली. अनेक वर्षे श्री विष्णु सहस्त्रनाम श्रवण झाल्याने त्या पुण्याने तिच्या मुक्ततेची वेळ जवळ अाली अाणि एके दिवशी धर्मदत्त समाेरून येताना पाहूून तिने मनात निश्चय केला. ताे अश्वत्थाजवळ येताच तिने त्याच्या पायी लाेटांगण घातले व ती रडू लागली. तिच्या रडण्याने धर्मदत्ताला तिची दया अाली. त्याने तिला रडण्याचे कारण विचारले. तेव्हा तिने अापली अवस्था सांगून या पिशाच्च याेनीतून मुक्ती देण्याची विनंती केली. धर्मदत्ताने तिला सांगितले की, "मी एक साामन्य ब्राह्मण अाहे. वेद, शास्त्र, पुराण मंत्र, तंत्र काहीही जाणत नाही. बालपणा -पासून केवळ स्नानसंध्या, पूचाअर्चा व सायंकाळी तुलसी अर्चन एवढेच करताे. मी तुझा उद्धार कसा करणार?"

*यावर पिशाच्चिनीने त्याला सांगितले की, "तुझ्याजवळ श्री विष्णु सहस्त्रनामाचे पुण्य अपार साचले अाहे. त्यात तुलसी अर्चना -च्या पुण्याची भर पडली अाहे. या सर्व पुण्याचे मला दान करून तु माझी मुक्तता कर. तु दानाचा संकल्प साेडताच माझी या पिशाच्च याेनीतून  मुक्तता हाेईल"असे सांगून तिने धर्मदत्ताचे पाय धरले व दीनपणे रडू लागली. तिच्या या हृदयद्रावक रडण्याने धर्मदत्ताला तिची दया अाली. त्याने विचार केला अापल्याकडूून जर तिचे दु:ख दूर हाेत असेल तर काय हरकत अाहे असा विचार करून त्याने हातात पाणी घेऊन त्याने अापले अाजवरच्या श्री विष्णु सहस्त्रनामपाठाचे व सहस्त्र तुलसी अर्चनाचे पुण्य तिला अर्पण करीत असल्याचा संकल्प केला व त्या पाण्याचे तिच्यावर सिंचन केले. त्याबराेबर तिला दिव्य स्वरुप प्राप्त झाले. हा चमत्कार पाहून धर्मदत्त अाश्चर्यचकित झाला. पण दुसऱ्याच क्षणी त्याला अापली शक्ती नष्ट झाल्यासारखे वाटू लागले व त्याच्या मनात विचार अाला की, "माझ्या अाजवरच्या अायुष्यातील सर्व पुण्य मी या पिशाच्चीनीला दिले व मी पुण्यहीन झालाे. वार्धक्यामुळे मी ही लवकरच मरणार; पण पुण्यक्षय झाल्यामुळे अापली अवस्था काय हाेईल? कुठल्या नीच याेनीत, कदाचित नरकातही अापली रवानगी हाेईल". या विचाराने ताे रडूू लागला. त्याला अाता खराेखरच अापण भिकारी झालाे असे वाटू लागले. त्याच्या मनात नैराश्यामुळे अात्मघाताचे विचार येऊ लागले.
#ब्रह्मांडनायक
त्याची अशी अवस्था पाहून त्याचे अाराध्य दैवत भगवान श्रीहरी विष्णुंना त्याची कणव अाली. ‘न वासुदेव भक्तांनां अशुभं विद्यते क्वचितया फलश्रुतीतील वचनाचा प्रत्यय अाणून देण्या साठी श्री महाविष्णु वृद्ध ब्राह्मणाच्या रुपाने तेथे अाले व धर्मदत्ताला त्यांनी रडण्याचे कारण विचारले. घडलेल्या सर्व घटनेचे वर्णन करताच ब्राह्मणरुपी विष्णू हसू लागले. धर्मदत्ताला त्यांच्या अनाठायी हसण्याचा राग अाला. ताे राेषाने म्हणाला, "मी इथे दु:खाने रडताे अाहे अाणि तुम्ही माझ्या रडण्याला हसता अाहात! जणू माझी चेष्टा करता अाहात". त्यावर ब्राह्मणरुपी श्री हरी विष्णु म्हणाले, "हसू नकाे तर काय करू? कारण तुम्ही नेमके उलटे करीत अाहात. तुम्हाला ज्या गाेष्टीने अानंद हाेण्याएेवजी तुम्ही रडत अाहात व दु:ख करीत अाहात".*
*दिङमुढ हाेवून पाहत असलेल्या धर्मदत्ताकडे दयार्द्र दृष्टीने पाहत त्यांनी स्पष्टीकरण केले की, "अहाे! या पिशाच्चीनीला श्री विष्णु सहस्त्रनाम पठणाचे पुण्य दान केल्याने तुमचे सर्व पुण्य नष्ट झाले, असे तुम्ही म्हणालात व त्यामुळे दु:खी हाेवून शाेक करीत अाहात हेच मुळी चुकीचे अाहे. याउलट या पिशाच्चीनीला पुण्य दान केल्यामुळे तुमचे पुण्य शतपटींनी वाढले अाहे.ते किती वाढले ते मी भविष्यवेत्ता असल्या -ने मला समजले व अानंद झाल्याने मी हसू लागले".

धर्मदत्ताला हायसे वाटले. त्याला अापले भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता वाटू लागली. त्याने क्षमा मागूून ब्राह्मणरुपधारी श्री हरी विष्णुंना नमस्कार केला व अापले भविष्य सांगण्याची विनंती केली. तेव्हा श्री हरी विष्णु सांगू लागले की, "या पिशाच्चीनी -ला तू पुण्यदान केल्याने तुझे व तिचे पुण्य एवढे वाढले अाहे की, पुढील जन्मात तुम्ही पती-पत्नी हाेवून प्रत्यक्ष श्री महाविष्णु तुमच्या पाेटी पुत्ररुपाने अवतार घेतील.

 धर्मदत्ता! तुझा पुढील जन्म अयाेध्येचा राजा अज व त्याची पत्नी इंदुमती यांचे पाेटी हाेऊन तू दशरथ राजा या नावाने ख्यात हाेशील. ही पिशाच्चीनी पुढील जन्मात काेशल राजाची कन्या महाराणी काैसल्या हाेवून तुम्हा दाेघांचा विवाह हाेईल. तुमच्या पाेटी श्री महाविष्णु 'राम'  हा सातवा अवतार घेतील". धर्मदत्ताच्या मनात शंका अाली ती त्याने बाेलून दाखविली की मी ब्राह्मण असता पुढील जन्मी मला क्षत्रियत्त्व कसे प्राप्त हाेईल. त्यावर हसून ब्राम्हणरूपधारी श्री महाविष्णु म्हणाले की,"तुलसी अर्चनासाठी सहस्त्र तुलसी जमा करताना तूू काहीवेळा लघूशस्त्रां- चा वापर केलास.त्या पापाने तुझे ब्राह्मणत्व जाऊन तुला क्षत्रियत्व प्राप्त हाेत अाहे. तसेच तू ब्रह्मचारी असल्याने तुला पुत्रप्रेमाचा अनुभव नाही. पुढील जन्मात श्रावणाच्या पित्याकडून पुत्रप्रेम कसे असते तेही तुला माहिती हाेईल. ही पिशाच्चीनी तर मुक्त झालीच अाहे. याेग्य काळी तिला जन्म प्राप्त हाेईल. तूही अायुष्याच्या अंतापर्यंत असेच श्री विष्णु सहस्त्रनाम पठण व श्री विष्णुभक्ती करत रहा म्हणजे तुझे कल्याण हाेईल" असा अाशिर्वाद देऊन श्रीमहाविष्णु गुप्त झाले.*

#श्री विष्णु सहस्त्रनाम पठणाच्या पुण्याने प्रत्यक्ष श्री भगवंताचे माता-पिता हाेण्याचे भाग्य लाभते.*

असे अाहे "श्री विष्णु सहस्त्रनाम" पठणाचे महात्म्य.

तर मित्रानो विडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, आणि आपले चैनल सबक्राइब करा

II ॐ विष्णवे नमः II
II ॐ नमो नारायणाय II
।। श्री स्वामी समर्थ ।।

Comments

Anonymous said…
This comment has been removed by a blog administrator.