स्वामींची एक अप्रकाशीत पण बरीचशी माहिती असलेली लीला | Balappa Maharaj | Shri Swami Samarth - YouTube
श्री स्वामी समर्थ
👏
स्वामींची एक अप्रकाशीत
पण बरीचशी माहिती
असलेली लीला
बाळाप्पा महाराज
स्वामी सेवेत अनेक
सेवेकरी होते. ते
त्यांच्यापरीने सेवा करीत
पण यात थोर असलेले श्रीमद्सद्गुरु
श्री बाळाप्पा महाराज
या बद्द्लचा हा
प्रसंग आहे. यांनी
स्वामीसेवेची निट व्यवस्था
ठेवली होती. किंबहुना
असे म्हणु की
स्वामींची सेवा कशी
करावी याचाच परिपाठ
यांनी सर्वांना घालुन
दिला जो आजही कार्यरत आहे.
रोज सकाळी भुपाळीने
सुरवात करुन स्नान
वगैरे जी सेवा असायची यात
बाळाप्पा,भुजंगा,चोळाप्पाचे
जावाई श्रीपाद स्वामी,
सुंदराबाई, हे व
ईतर जण असावयाचे.प्रत्येकाकडे कामे ठारलेली
असायची यात ढवळा
ढवळ चालायची नाही.
कुणाचीही हिमंत नसायची
ढवळा ढवळ करायला.
रोज आरती व्हायचीच
मग स्वामी कोठेही
असोत यात खंड पडला नाही.
आरती झाली की मग भक्तांनी
समर्पित केलेला जो
काही नैवैद्द आसेल
तो मात्र स्वामी
स्वहस्ते वाटत हेतु
हा की सर्वांना
स्वामींचे दर्शन मिळावे.
हा प्रसाद वाटत
असतांना बाळाप्पा नेहेमी
प्रसादा करीता हात
पुढे करीत पण स्वामींनी कधिही बाळाप्पाला
प्रसाद दिला नाही.
बाळाप्पा रोज मनात
खट्टू होऊन त्यांच्या
निवास स्थानी येत
अन आज ही आपणास प्रसाद
मिळाला नाही म्हणून
रडत बसत.
अशी बरीच वर्षे
गेली रोज बाळाप्पा
हात पुढे करीत
अन स्वामी काहिही
देत नसत. एक दिवस मात्र
बाळाप्पानीं ठरवले की
काहिही हिवो आज प्रसाद घेतल्या
शिवाय परत फिरायचेच
नाही आरती झाली
अन दर्शन व प्रसाद घेण्या
करीता नेहेमी प्रमाने
भक्त गण स्वामींच्या
भोवती गोलाकार ऊभे
राहिले. स्वामी सर्वांना
प्रसाद देऊ लागले.
बाळाप्पानी काय केले
असावे? एक भक्ताच्या
दोन पाया मधुन
हात घातला अन
प्रसादाची वाट
पाहु लागले हेतु
हा की मी स्वामींना दिसुच नये
. ( वास्तवीक स्वामीच या स्रुष्टीचे
चालक पालक आहेत
मग कुठलिही गोष्ट
त्यांच्या पासुन लपणे
शक्यच नाही पण लिलाच करायच्या
म्हटल्या नंतर त्यांना
कोण अडवणार नाही
का ?)
असो स्वामी प्रसाद
वाटत वाटत बाळाप्पांच्या
हाता पर्यंत आले
अन फक्त एक क्षण भरच
ऽऽ स्वामी थांबले
अन दुसर्याक्षणी बाळाप्पांच्या
हतात भली मोठी
खारीक प्रसाद म्हणुन
पडली.
बस्स एका क्षणात
बाळाप्पांनी ती खारीक
घट्ट पकडली तेथून
धुम ठोकली न जाणो स्वामी
पहातील अन मोठ्या
कष्टाने मिळालेला प्रसाद
स्वामी काढुन घेतील.
बाळाप्पा आपल्या घरी
आले, दरवाजा आतुन
बंद केला,
ह्रुदयाशी प्रसाद म्हणुन
मिळालेली खारिक घट्ट
धरली, अन डोळे बन्द करुन
हमसुन हमसुन अतिशय
आनंदाने ते रडू लागले." स्वामी का
हो ईतुका वेळ
लावलात या गरिबाला
प्रसाद देण्यास. मज
पामराकडुन असा काय
अपराध घडला की मला येव्हढी
वाट पाहावी लागली.
हा हा मज पामराचे आज भाग्य
ऊजळले मला स्वामींचा
प्रसाद मिळाला ," असे
म्हणत म्हणत ते
लहान मुलासारखे किती
तरी वेळ तो प्रसाद न
खाता रडत राहीले
त्यांची भाव समाधी
लागली होती अन एव्हढ्यात दर्वाजा जोर
जोरात वाजु लागला.
"बाळाप्पा दार ऊघडा"
. "बाळाप्पा दार ऊघडा"
. स्वामींनी तुम्हांला असेल तसे
बोलावले आहे.
झाले, बाळाप्पांनी ओळखले की
स्वामींनी का बोलावले
ते. त्यांच्या पुढे
जाण्याशिवाय पर्यायच नव्हता.
मान खाली घालुन
बाळाप्पा स्वामीं पुढे हाताची
मुठ धरुन ऊभे
राहिले.
" हरामखोर
हमसे नजर चुराके
परसाद लेके जाताय
तु बडा जिंद
है. ना तु मुझे छोडेगा,
ना मै तुझे लाओ परसाद
ला, "
बाळाप्पांनी ति खारीक
स्वामींना देऊन टाकली.
स्वामींनी ती खारीक
घेतली अन बाळाप्पाला
अत्यंत प्रेमाने जवळ
घेतले आणि म्हणाले
" अरे तु या
प्रसादाच्या मागे काय
लागला आहेस जो प्रसाद तुला
द्यायचा आहे तो मी कधिच
दिला आहे माझ्या
मांडीवर तुला घेतले
आहे माझ्या मांडी
शेजारीच मांडी घालुन
बस हाच तुला
प्रसाद. या नंतर बाळाप्पांनी कधिही प्रसादाचा
हट्ट केला नाही.
स्वामींच्या समाधी शेजारीच
समाधी घेण्याची परवानगी.!!
जी कोणालाही मिळाली नाही.
!!
धन्य ते स्वामीगुरु
अन धन्य ते शिष्य बाळाप्पा
.!!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक..
राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री
सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन
भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी
श्री स्वामी समर्थ
महाराज कि जय !!
🌹
!! श्री
स्वामी समर्थ !! 🌹🌹
Comments