श्रीपाद श्रीवल्लभांची कर्मभूमी श्री क्षेत्र पिठापुरम | Shri Siddha Mangal Stotra

श्रीपाद श्रीवल्लभांची कर्मभूमी श्री क्षेत्र पिठापुरम | Shri Siddha Mangal Stotra

|| सिद्धमंगलस्तोत्र || १) श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा | जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
२) श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा | जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
३) माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा | जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
४) सत्यऋषीश्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा | जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
५) सावित्र काठकचयन पुण्यफला भारद्वाज ऋषी गोत्र संभवा | जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
६) दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा | जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
७) पुण्यरुपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफलसंजाता | जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
८) सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा | जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
९) पीठिकापुर नित्यविहारा मधुमतीदत्ता मंगलरूपा | जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव || || श्रीपादराजमं शरणं प्रपद्ये || सिद्धमंगल स्तोत्र हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात सतराव्या अध्यायात हे स्तोत्र येते. ग्रंथकार शंकर भट म्हणतात," श्री बापनाचार्युलुंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी "सिद्धमंगल" स्तोत्र लिहिले. प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायिली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहिल. या स्तोत्रात व्याकरण दृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधीनिषेध नाही. मला ते स्तोत्र श्री बापनाचार्युलूच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले. हे स्तोत्र माझ्या ह्रदयावर अंकित झाले आहे. परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करुन केल्यास सहस्त्र सदब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. याच्या पठणाने मनतील सर्व कामना पुर्ण होतात. जे भक्त मन काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयांची आराधना करुन या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस प्राप्त होतात. तसेच याच्या नियमित गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रुपाने संचार करणार्‍या सिद्धी प्राप्त होतात.

Comments