Jay Labh Yash Prapti Stotra | श्री दत्त महाराज स्तोत्र | जयलाभ यश स्तोत्र
श्री दत्त महाराज
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ||
जयलाभ यश स्तोत्र
दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलम् ।
प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी समाऽवतु ॥ १ ॥
दीनबन्धुं कृपासिन्धुं सर्वकारणकारणम् ।
सर्वारक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी समाऽवतु ॥ २ ॥
शरणागतदीनार्तपरित्राणपरायणम् ।
नारायणं विभुं वंदे स्मर्तृगामी समाऽवतु ॥ ३ ॥
सर्वानर्थहरं देवं सर्वमंगलमंगलम् ।
सर्वक्लेशहरं वन्दे स्मर्तुगामी समाऽवतु ॥ ४ ॥
शोषणं पापपंकस्य दीपनं ज्ञानतेजसः ।
भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी समाऽवतु ॥ ५ ॥
सर्वरोगप्रशमनं सर्वपीडा निवारणम् ।
तापप्रशमनं वन्दे स्मर्तृगामी समाऽवतु ॥ ६ ॥
ब्रह्यण्यं धर्मतत्त्वज्ञं भक्तकीर्तिविवर्धनम् ।
आपदुद्धरणं वन्दे स्मर्तृगामी समाऽवतु ॥ ७ ॥
जन्मसंसारबन्धघ्नं स्वरुपानंददायकम् ।
निःश्रेयसप्रदं वन्दे स्मर्तृगामी समाऽवतु ॥ ८ ॥
जयलाभयशः कामदातुर्दत्तस्य यः स्तवम् ।
भोगमोक्षप्रदस्येमं प्रपठेत्स कृती भवेत् ॥ ९ ॥
॥ इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं दत्तात्रेयं जयलाभायशः प्राप्ति स्तोत्रं संपूर्णम् ॥
मराठी अनुवाद (स्वैर)१) महात्मा दत्तात्रेय हा भक्तांवर माया, प्रेम करणारा व त्यांना वर देणारा आहे. सर्व त्रासांतून, संकटांतुन सोडविणार्या; त्या आठवण केल्याबरोबर येणार्या दत्तात्रेयाला मी नमस्कार करतो. तो आमचे रक्षण करो.२) तो दीन-दुर्बल लोकांचा बन्धु, कृपेचा सागर व सर्व कारणांचे कारण आहे. सर्वांचे रक्षण करणार्या; त्या आठवण केल्याबरोबर येणार्या दत्तात्रेयाला मी नमस्कार करतो. तो आमचे रक्षण करो.३) शरणागत, दीन, दुःखी लोकांचे त्रास हरण करणार्या त्या आठवण केल्याबरोबर येणार्या नारायणाला मी नमस्कार करतो. तो आमचे रक्षण करो.४) सर्व अनर्थांचे हरण करणारा देव, सर्व मंगलाचे मंगल, सर्व क्लेश नाहीसे करणार्या; त्या आठवण केल्याबरोबर येणार्या दत्तात्रेयाला मी नमस्कार करतो. तो आमचे रक्षण करो. ५) आमच्या पापांचे शोषण करणारा, ज्ञानरुपी तेजाच्या दिपाने अज्ञान हरण करणार्या व भक्तांना इच्छिलेले व हितकर असलेले सर्व देणार्या; त्या आठवण केल्याबरोबर येणार्या दत्तात्रेयाला मी नमस्कार करतो. तो आमचे रक्षण करो.६) सर्व रोगांचा नाश, सर्व त्रास, पीडांचे हरण करणार्या आणि आपत्तींतून उद्धारण करणार्या; आमच्या सांसारिक तापाचे, दुःखांचे, त्रासांचे हरण करणार्या; त्या आठवण केल्याबरोबर येणार्या दत्तात्रेयाला मी नमस्कार करतो. तो आमचे रक्षण करो.७) तो ब्रह्मज्ञानी, तत्त्वज्ञ आणि भक्तांची कीर्ति वाढविणारा आहे. आपत्तींमधून उद्धरणार्या; त्या आठवण केल्याबरोबर येणार्या दत्तात्रेयाला मी नमस्कार करतो. तो आमचे रक्षण करो. ८) जन्म-संसार-बन्ध यांचे उच्चाटन करुन म्हणजेच मोक्ष देऊन स्वरुपाचा आनंद प्राप्त करुन देणार्या, श्रेयस्कर स्थान देणार्या; त्या आठवण केल्याबरोबर येणार्या दत्तात्रेयाला मी नमस्कार करतो. तो आमचे रक्षण करो.९) हे दत्तस्तवन जय, लाभ, यश, लोकिक कामना पूर्ण करणारे, भोग व मोक्ष दोन्ही देणारे आहे. ह्याचा पाठ करणारास त्याचा लाभ होईल.
अशा रीतीने परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतींनी रचिलेले हे जयलाभायश स्तोत्र संपूर्ण झाले.
Comments