अतिशय सुंदर अशी श्री दत्त गुरूंची आरती | Dattaguru Aarti

अतिशय सुंदर अशी श्री दत्त गुरूंची आरती - Dattaguru Aarti

करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरुवुनिया मन ।। दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करून ।। धरणीवर नर पिढीत झाले भवरोगे सर्व ।। कामक्रोधादिक रिपुवर्गे व्यापूनि सगर्व ।। योग्य याग तप दान नेणती असताही अपूर्व ।। सुलभपणे निजभजनें त्यासी उद्धरी जो शर्व ।। 

करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरुवुनिया मन

अत्रिमुनींच्या सदनी तिन्ही देव भुके येति ।। भिक्षुक होऊनि अनसूजेप्रती बोलती त्रयमूर्ति ।। नग्न होऊनि आम्हांप्रती द्या अन्न असे वदती ।। परिसुनी होऊनि नग्न अन्न दे तव ते शिशु होती ।।

करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरुवुनिया मन

दुर्वासाभिध मौनी जाहला शंभू प्रमथेद्र ।। ब्रम्हदेव तो जाहला चंद्र जाहला उपेंद्र ।। दत्तात्रेय जो बीतनिद्र तो तारक योगीन्द्र ।। वासुदेव य्च्चरण चिंतूनि हो नित्यअतंद्र ।।

करितो प्रेमे तुज निरांजन स्थिरुवुनिया मन



Comments