Pasaydan | Sant Dnyaneshwar Mauli


आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥ जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥ दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥ चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी । भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥ आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी । येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥ #Pasaydan #SantDnyaneshwarMauli

Comments